Home > Economy > भारतातील 50 टक्के कामगार कर्जबाजारी

भारतातील 50 टक्के कामगार कर्जबाजारी

भारतातील 50 टक्के कामगार कर्जबाजारी
X

क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने (सीआयसी) मंगळवारी भारतातील कर्जबाजारी कामगारांबद्दल एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार देशातील 40 कोटी कामगारांच्या लोकसंख्येपैकी जवळपास अर्धे कामगार कर्जबाजारी आहेत. ज्यांनी प्रत्येकाने जवळपास एक कर्ज काढलेलं आहे किंवा त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे.

ट्रान्सयुनियन सिबिल च्या रिपोर्टनुसार, कर्ज देणार्‍या संस्था मोठ्या प्रमाणात नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. जे लोक कर्ज घेत आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक लोक हे बँकांचे ग्राहक आहेत.

रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जानेवारी २०२१ पर्यंत भारताची एकूण कामगारांची 40.07 कोटी होती. यामधील किरकोळ कर्ज घेणाऱ्यांची संख्या २० कोटी आहे.

सीआयसी च्या आकडेवारीनुसार, ग्रामीण तसेच निम शहरी भागांमधील १८ - ३३ वयोगटातील ४० कोटी लोकांमध्ये कर्जबाजार वाढण्याची शक्यता आहेत. तसेच हे कर्ज वाढीचे प्रमाण ८ टक्के आहे.

एनटीसी न्यू टू क्रेडिट वर्गामध्ये महिला कर्जदारांची संख्या कमी आहे. ऑटो लोन मध्ये १५ टक्के महिला, होम लोन मध्ये ३१ टक्के महिला, वैयक्तिक कर्जात २२ टक्के तर कनज्यूमर ड्यूरेबल लोनमध्ये २५ टक्के महिलांचा समावेश आहे.

सीआयसी च्या आकडेवारीनुसार एनटीसी ग्राहक अशा पतसंस्थांवर निष्ठा दाखवत आहेत. ज्यांनी त्यांना पहिल्यांदाच कर्ज दिलेलं आहे. दरम्यान गेल्या दशकात बँकांनी किरकोळ कर्ज देण्याला प्राधान्य दिलेल पाहायला मिळत आहे.

Updated : 30 Jun 2021 6:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top