Home > Economy > संकटातील बँकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, BAD बँकेची घोषणा

संकटातील बँकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, BAD बँकेची घोषणा

संकटातील बँकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, BAD बँकेची  घोषणा
X

आर्थिक मंदी आणि त्यानंतर आलेले कोरोना संकट यामुळे अडचणीत आलेल्या बँकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गुरूवारी ही घोषणा करण्यात आली. National Asset Reconstruction Company या नावाने बॅड बँकेची घोषणा करण्यात आली आहे. आता ही कंपनी २ लाख कोटी रुपयांची थकीत कर्ज स्वताकडे घेणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून सरकार 30 हजार 600 कोटींची सरकारी हमी देणार आहे. यंदाचे बजेट सादर करताना निर्मला सीतारामन यांनी याबाबत संकेत दिले होते.

कोरोना संकट काळात गंभीर आर्थिक संकट तयार झाले आहे. त्यातच आधीच तोट्यात असलेल्या बँकांची अवस्था वाईट झाली. याकरीता देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय़ घेतला आहे. सरकारने जाहीर केलेला ३० हजार ६०० कोटींच्या निधीची तरतूद ५ वर्षांसाठी करण्यात आली आहे. त्याकरीता National Asset reconstruction company Ltd. स्थापना करण्यात येईल. या माध्यमातून केंद्र सरकार निधीची हमी देणार आहे. National Asset reconstruction कंपनीतर्फे दिल्या जाणाऱ्या सिक्युरिटी रिसीट्स करीता ही गॅरंटी असेल. देशातील बँकिंग क्षेत्रापुढील समस्यांचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

बॅड बँक म्हणजे काय रे भाऊ?

बॅड बँक नाव असले तरी ती बँक नसते. तर बँकांच्या मालमत्तेची पुनर्बांधणी करण्याचे काम ही कंपनी करते. बँकांची अनुत्पादक मालमत्ता म्हणजेच बुडीत कर्ज या कंपनीला हस्तांतरित केली जातात. यामुळे बँका जास्तीत जास्त लोकांना कर्ज देऊ शकतात. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळते. देशात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या एका वर्षाच्या काळात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे लावावे लागले. पण यामुले उद्योग,व्यवसायांचे कंबरडे मोडले गेले. याचा परिणाम बँकांच्या कामगिरीवर तसेच कार्यक्षमतेवर झाला. त्यामुळे बँकांची थकीत कर्ज आणि अनुत्पाद मालमत्ता वाढत गेली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांची अनुत्पादित किंवा थकीत कर्जे म्हणजेच मालमत्ता NARCL कंपनीकडे सोपवायची आहेत. ही बॅड बँक थकीत कर्जाच्या मालमत्ता बाजारात विकण्यापासून कर्जवसुलीची कारवाई करेल, अशी तरतूद यात आहे.

Updated : 16 Sep 2021 1:56 PM GMT
Next Story
Share it
Top