Home > Economy > Adani group ने खाल्ला सपाटून मार

Adani group ने खाल्ला सपाटून मार

Adani group ने खाल्ला सपाटून मार
X

हिंडरबर्गच्या (hinderberg)अहवालानंतर कोसळलेला शेअर बाजार (NSE) अजूनही सावरायला तयार नाही. आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशीही अदानी ग्रुपच्या (Adani Group Shares) शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे शेअर्समध्ये लोअर सर्किटमधे आहेत. ज्या चार शेअर्समध्ये सर्किट नाही ते देखील घसरणीसह व्यवहार करत आहेत.

अदानी समूहाच्या समभागांवर नजर टाकली तर, अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक 8 टक्क्यांनी घसरला आहे आणि तो रु. 1702 च्या पातळीवर घरसला आहे. अदानी ग्रीन 5% घसरुण 688 रुपयांवर, अदानी विल्मर 5% घसरुण 414 रुपयांवर, अदानी ट्रान्समिशन 5% घसरुण 1127 रुपयांवर, अदानी पॉवर 5% घसरुण 156 रुपयांवर, अदानी टोटल गॅस 5% घसरुण 1192 रुपयांवर आला आहे.

अदानी पोर्ट्स (Adani ports) 7% घसरुण 543 रुपयांवर, ACC 4.20 टक्क्यांनी घसरुण 1801 रुपयांवर, अंबुजा सिमेंट 6.35 टक्क्यांनी घसरुण 338 रुपयांवर आणि NDTV 5 टक्क्यांनी घसरुण 198 रुपयांवर आला आहे.

कंपनीच्या बाँड पोर्टफोलिओमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अदानी समूहाच्या शेअर्सवर ही घरसण दिसून येत आहे. शुक्रवारी, मूडीजने अदानी समूहाच्या आठ कंपन्यांचे मानांकन कमी केले आहे, त्याचारही फटका अदानी समुहाला बसला आहे.

अदानी समूहाच्या महसूलात कपात?

अदानी समूहाने महसूल वाढीचे लक्ष्य कमी केल्याने बाजाराचीही निराशा झाली आहे आणि त्यासोबत समूह भांडवली खर्च कमी करणार आहे. अदानी समूहाने आता पुढील आर्थिक वर्ष 2023-24 साठी 15-20 टक्के महसूल वाढीचे लक्ष्य ठेवले आहे.समूहाच्या भांडवली खर्चाच्या योजनेवर म्हणजेच कंपन्यांच्या विस्तार योजनेवर होणारा खर्च कमी करेल. आता समूहाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यावर कंपनीचे लक्ष असल्याचे अदानी समुहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Updated : 13 Feb 2023 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top