Home > Business > GDP वाढूनही रुपया का गडगडला ? रुपयाच्या घसरणीची ३ प्रमुख कारणे

GDP वाढूनही रुपया का गडगडला ? रुपयाच्या घसरणीची ३ प्रमुख कारणे

Why did the rupee fall despite GDP growth? 3 main reasons for the fall of the rupee

GDP वाढूनही रुपया का गडगडला ? रुपयाच्या घसरणीची ३ प्रमुख कारणे
X

सोमवारी भारतीय रुपयाने पुन्हा एकदा ऐतिहासिक तळ गाठला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया आता ९० च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. परकीय गुंतवणूकदारांनी लावलेला विक्रीचा सपाटा (Portfolio Outflows) आणि भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत (Trade Deal) निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे बाजारातील धारणा (Market Sentiment) कमजोर झाली आहे.

नेमकी स्थिती काय ?

सोमवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८९.८३ या नवीन नीचांकी पातळीवर घसरला. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी रुपयाने ८९.४९ चा नीचांक गाठला होता, तो विक्रमही आज मोडीत निघाला आहे. या चलन अवमूल्यनाचा मोठा फटका भारतीय शेअर बाजारालाही बसला. सकाळच्या सत्रात उच्चांकावर असणारे निर्देशांक, रुपयाच्या या पडझडीमुळे गडगडले आणि बाजार नकारात्मक पातळीवर बंद झाला.

जीडीपीचा दिलासा नाही ?

भारताचा आर्थिक विकास दर (GDP) ८.२% इतका दमदार असूनही रुपयाला त्याचा म्हणावा तसा आधार मिळत नाहीये. याचे मुख्य कारण म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाटाघाटींमध्ये प्रगतीचा अभाव. जरी दुसऱ्या तिमाहीत 'रिअल जीडीपी' ८.२% इतका अपेक्षापेक्षा जास्त आला असला, तरी 'नॉमिनल जीडीपी' (Nominal GDP) ८.७% इतका मर्यादित राहिल्याने चिंता वाढलीय.

रुपया का पडतोय ?

रुपयाच्या या कामगिरीमागे तीन प्रमुख कारणे आहेत:

१. वाढती व्यापार तूट (Trade Deficit): आयातीचा खर्च वाढत असून निर्यातीत त्या प्रमाणात वाढ होत नाहीये.

२. परकीय निधीचा ओघ आटला: परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणावर पैसा काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

३. धोरणात्मक बदल: विनिमय दरातील चढ-उतारांबाबत (Exchange-rate moves) सध्या अधिक लवचिकता स्वीकारल्याने रुपयावरील दबाव स्पष्ट दिसत आहे.

Updated : 1 Dec 2025 4:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top