Home > Business > व्हॅलेंटाईन डे आणि सोन्या-चांदीच्या दरात घसरण ; ग्राहकांना दिलासा

व्हॅलेंटाईन डे आणि सोन्या-चांदीच्या दरात घसरण ; ग्राहकांना दिलासा

गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या भाव मुळे ग्राहक संतापले आहेत. देशात निर्माण झालेल्या मंदी मुळे सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे.

व्हॅलेंटाईन डे आणि सोन्या-चांदीच्या दरात घसरण ; ग्राहकांना दिलासा
X

गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या भाव मुळे ग्राहक संतापले आहेत. देशात निर्माण झालेल्या मंदी मुळे सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे लग्नसराईसाठी अनेक ग्राहकांना सोने चांदी खरेदी करताना चांगलीच मुरड घालावी लागत आहे. इतकचं नाही तर ही दर कमी होतील आणि आपण सोने खरेदी करू या आशेवर ग्राहक `वेट अँड वॉच` च्या भूमिकेत दिसून येत आहेत. परंतु ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्हॅलेंटाईन डे आहे आणि सोन्या चांदीच्या दरात घसरण दीसत आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी चांदीच्या किमतीत कमी असील असं सांगण्यात आले होते. सोमवारी चांदीचा भाव 369 रुपयांनी घसरून 66371 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तर शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 743 रुपयांनी घसरून 67740 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.


सोमवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोने प्रति 10 ग्रॅम 22 रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात 369 रुपयांनि घट झाली आहे. सोने 57000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 67000 रुपये प्रति किलो किलोच्या खाली विकायला सुरुवात झाली.23 कॅरेट सोने 22 रुपयांनी महागून तब्बल 56832 रुपये झाले आहे तर 24 कॅरेट सोने 22 रुपयांनी महागून 57060 रुपये झाले आहे. , 18 कॅरेट सोने 16 रुपयांनी महागले असून तब्बल 42795 रुपये झाले आहे. तर 22 कॅरेट सोने 20 रुपयांनी 52267 रुपये आहे. दरम्यान जुन सोन ठेऊन नवीन सोन बनूवुन घ्यायचा नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्या चांदीच्या दुकानावर अफाट गर्दी पाहायला मिळते. परंतु अर्थसंकल्पात सोने चांदी ला दिलासा देणारा कोणताही निर्णय घेण्यात नाही आला आहे परंतु फुडहचया वर्षी या वर काही तरी उपाय काडुन दिलासा देतील अशी आशा ग्राहक व्यक्त करत आहेत.

Updated : 14 Feb 2023 5:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top