Home > Business > म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना...

म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना...

सध्या स्टॉक मार्केट तेजीत आहे. तर बँकांमधील ठेवींचे दर महिन्यागणिक कमी होत आहेत. काय कारण आहे? म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना आर्थिक सेन्स सोबत कॉमन सेन्स आपण सोबत ठेवतो का? वाचा अर्थज्ञान मध्ये अर्थतज्ञ संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण

म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना...
X

स्टॉक मार्केट तेजीत आहे. तर बँकांमधील ठेवींचे दर महिन्यागणिक कमी होत आहेत. म्हणून शेअर्स मध्ये, म्युच्युअल फंडात पैसे घालायचे ठरवले आणि स्टॉक मार्केटशी संबंधित वर्तमानपत्रे, मॅगझिन्स अभ्यास करू लागलो. आणि एका मूलभूत प्रश्नाशी येऊन थांबलो आहे.

अमुक शेअर चांगला आहे. त्या कंपनीचे भविष्यात अमुक प्लँन्स आहेत. आकर्षक पी इ मल्टिपल आहे. तमूक परतावा नक्की मिळेल असे सांगणारे विश्लेषक वाचले. माझ्या मनात प्रश्न आला की हा शेअर एव्हढा आकर्षक असेल तर या माणसाने त्यात गुंतवणूक केलेली असली पाहिजे; म्हणून त्यांना ईमेल केली.

सर्वांचे छापील उत्तर: आम्ही ज्या शेअर्सची चर्चा करतो. त्यात आमचे स्वतःचे एक्सपोजर नसले पाहिजे असा नियम आहे. म्युच्युअल फंडाची तीच स्थिती; कोणता फंड? कोण फ़ंड मॅनेजर मॅनेज करतो. त्याचे नाव देतात. त्यांना ईमेल केला. त्यांचे देखील तेच छापील उत्तर...

खरेतर शेअर मध्ये गुंतवणुकीसाठी पब्लिकला शिफारस करतांना त्या शिफारस कर्त्यावर / विश्लेषकावर असे बंधन पाहिजे. त्याने असे लिहिले पाहिजे

"मी माझे १० किंवा २५ लाख रुपये यात कालच गुंतवले आहेत, तुम्ही डोळे झाकून शेअर विकत घ्या " लोकांचा विश्वास वाढेल की कमी होईल..

म्युच्युअल फंडाच्या फंड मॅनेजर्सना हाच नियम लावा; जो फंड मॅनेज करण्याची जबाबदारी त्याने घेतली. त्यात त्याने स्वतःच्या टोकन नाही, भरपूर ठेवी घातल्या आहेत. आणि या गुंतवणुकीचे पुरावे त्यांनी सार्वजनिक केले पाहिजेत; आणि त्या गुंतवणुकीवेळी काढून घ्याल त्या वेळी ठळकपणे ते पब्लिकला कळवले पाहिजे. असे बंधनकारक करा...

कोण ठरवते हे नियम? आणि कोट्यवधी नागरिक ते नियम कायद्याने स्थापन झालेल्या संस्थेने (उदा सेबी) बनवले म्हणून आंधळेपणाने स्वीकारतात? काही काऊंटर प्रस्ताव देऊ शकत नाहीत ?

वित्तीय निरक्षरता, स्वहित न कळणे, नंदीबैलासारखी मान डोलवायची सवय, सुटेड बुटेड इंग्लिश भाषेचे प्रचंड दडपण आणि बरेच काही... कॉर्पोरेट किंवा वित्त भांडवलशाहीचा अभ्यास वगैरे नंतर करूया; आधी कॉमन सेन्सवर आधारित प्रश्न तर विचारा असे शेकडो प्रश्न विचारता येतील.

संजीव चांदोरकर

Updated : 15 Nov 2020 7:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top