SBI चा दावा ! या एका बदलामुळे लाखो लोकांना मिळणार नोकरी
X
चार नवीन कामगार संहितांची (Labour Codes) अंमलबजावणी झाल्यास देशात 77 लाख नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात . तसेच 75,000 कोटींची खप वाढ होऊ शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) संशोधन अहवालात वर्तवण्यात आला आहे. हा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध झाला.
21 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने खालील चार कामगार संहितांची अंमलबजावणीबाबत अधिसूचना जारी केली आहे.
- वेतन संहिता (Code on Wages), 2019
- औद्योगिक संबंध संहिता (Industrial Relations Code), 2020
- सामाजिक सुरक्षा संहिता (Code on Social Security), 2020
- व्यवसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाची परिस्थिती संहिता (Occupational Safety, Health and Working Conditions Code), 2020
बेरोजगारीत घट होणार
सध्याची बेरोजगारी दर 3.2% आहे. SBI ने तीन अंदाज मांडले आहेत:
1. कंझर्व्हेटिव्ह अंदाज — बेरोजगारी 0.28% नी कमी होऊन 2.9%
2. मिड-रेंज अंदाज** — बेरोजगारी 0.57% नी कमी होऊन 2.6%
3. ऑप्टिमिस्टिक अंदाज — बेरोजगारी घटून थेट 1.9%
70.7% कामकाजयोग्य लोकसंख्येच्या आधारावर 77 लाख नवीन रोजगार निर्माण होतील,असे SBI ने अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कामागार संहितामुळे पुढील काही वर्षांत देशातील बेरोजगारी 0.3% ते 1.3% नी कमी होण्याची शक्यता आहे.
किमान वेतन वाढल्यास खिशात जास्त पैसे मिळणार आहेत. सध्या भारतातील सरासरी किमान वेतन दर हा प्रति व्यक्ती प्रति दिवस 546 रुपये एवढा आहे तर किमान सरासरी वेतन हा 451 प्रति दिवस आहे. वेतन संहिता लागू झाल्यावर सर्व कामगारांना किमान वेतन लागू होणार असल्याने कामगारांचे सरासरी दैनंदिन उत्पन्न 95 रुपयांनी वाढणार आहे. तीस टक्के बचत दर धरल्यास प्रति व्यक्ती ६६ रुपये खर्चासाठी उरतील. तसेच एकूण 75 हजार कोटी रुपयांचा खप वाढेल असाही अंदाज SBI ने व्यक्त केला आहे.






