NHAI InvIT : आता हायवेतून कमाईची संधी ! NHAI च्या 'InvIT' ला सेबीची मंजुरी
NHAI InvIT: Now an opportunity to earn from highways! SEBI approves NHAI's 'InvIT'.
X
भारतीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सर्वसामान्यांसाठी कमाईचे एक नवीन साधन उत्पन्न करून देत आहरे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे तुम्ही चिंतेत असाल आणि बँकेच्या FD पेक्षा जास्त परतावा शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. NHAI द्वारे समर्थित 'राजमार्ग InvIT' (National Highways Infra Trust) ला बाजार नियामक SEBI कडून मंजुरी मिळाली आहे.
या मंजुरीमुळे आता सामान्य गुंतवणूकदार (Retail Investors) थेट भारताच्या हायवे प्रोजेक्ट्समध्ये पैसे गुंतवू शकतील आणि त्यातून मिळणाऱ्या टोल उत्पन्नाचा वाटा मिळवू शकतील. NHAI या InvIT च्या माध्यमातून सुमारे ९,००० ते १०,००० कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. सेबीच्या मंजुरीनंतर आता हा इश्यू लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे (अंदाजे फेब्रुवारी २०२६). विशेष म्हणजे, यातील मोठा हिस्सा हा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी असला तरी, सामान्य गुंतवणूकदारांसाठीही यात आरक्षित वाटा असणार आहे.
InvIT म्हणजे नक्की काय ? (What is InvIT?)
जर तुम्हाला 'म्युच्युअल फंड' ही संकल्पना माहित असेल, तर InvIT समजणे खूप सोपे आहे.
म्युच्युअल फंडात लोकांकडून पैसे जमा करून शेअर्समध्ये गुंतवतात.
InvIT (Infrastructure Investment Trust)मध्ये लोकांकडून पैसे जमा करून ते रस्ते, हायवे किंवा पॉवर ग्रिडसारख्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये गुंतवतात.
सोप्या भाषेत तुम्ही हायवेचे मालक बनू शकत नाही, पण InvIT चे युनिट्स खरेदी करून तुम्ही त्या हायवेच्या कमाईत भागीदार नक्कीच बनू शकता. हायवेवरून गाड्या जातील, टोल जमा होईल आणि त्यातील काही भाग तुम्हाला 'डिव्हिडंड' (Dividend) स्वरूपात मिळेल.
सामान्य गुंतवणूकदारांसाठी का आहे फायदेशीर ?
सरकारी पाठिंबा (Safety) : हे InvIT थेट NHAI द्वारे स्पॉन्सर केलेले असल्याने यात खाजगी कंपन्यांच्या तुलनेत जोखीम कमी मानली जाते.
नियमित उत्पन्न (Cash Flow): InvIT ला त्यांच्या उत्पन्नाचा ९०% भाग गुंतवणूकदारांना वाटणे बंधनकारक असते. त्यामुळे तुम्हाला नियमित अंतराने पैसे (Cash Flow) मिळू शकतात.
महागाईवर मात (Inflation Beating): हायवेवरील टोलचे दर दरवर्षी महागाईनुसार वाढतात. त्यामुळे जसा टोल वाढेल, तसे तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता असते.
गुंतवणूक कधी आणि कशी करता येईल ?
सध्या मिळालेल्या माहितीनुसार, हा इश्यू पुढील वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी २०२६ च्या सुमारास येण्याची शक्यता आहे.
हे युनिट्स शेअर बाजारात (BSE/NSE) लिस्ट होतील. जसे तुम्ही शेअर्स खरेदी करता, तसेच तुमच्या डिमॅट अकाउंट (Demat Account) द्वारे तुम्ही यात गुंतवणूक करू शकाल.






