Home > Business > Mutual Fund इन्व्हेस्टमेंट : नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक, 'या' फंडांना सर्वाधिक पसंती

Mutual Fund इन्व्हेस्टमेंट : नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक, 'या' फंडांना सर्वाधिक पसंती

Mutual Fund Investment: Record investment in mutual funds in November, 'these' funds were the most preferred.

Mutual Fund इन्व्हेस्टमेंट : नोव्हेंबरमध्ये म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक, या फंडांना सर्वाधिक पसंती
X

जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असतानाही भारतीय शेअर बाजारावर (Share Market) गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. निफ्टीने (Nifty) गाठलेला नवा उच्चांक आणि सुधारलेली मार्केट सेन्टिमेंट्स यामुळे नोव्हेंबर महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात (Equity Mutual Funds) येणाऱ्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे.'असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया'ने (AMFI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये इक्विटी फंडातील ओघ (Inflows) २१ टक्क्यांनी वाढून २९,९११ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑक्टोबरमध्ये हा आकडा २४,६९० कोटी रुपये होता.

गुंतवणूकदारांची कोणत्या फंडाला पसंती ?

नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांनी लार्ज कॅपपेक्षा फ्लेक्सी कॅप आणि मिड-स्मॉल कॅप फंडांना अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे.

फ्लेक्सी कॅप फंड (Flexi Cap): सर्वाधिक ८,१३५ कोटी रुपयांची गुंतवणूक (ऑक्टोबरमध्ये ८,९२९ कोटी).

मिड कॅप फंड (Mid Cap): ४,४८७ कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक (ऑक्टोबरमध्ये ३,८०७ कोटी).

स्मॉल कॅप फंड (Small Cap): ४,४०७ कोटी रुपयांची वाढ (ऑक्टोबरमध्ये ३,४७६ कोटी).

सोनं-चांदी ईटीएफमध्ये किती गुंतवणूक ?

सोन्या-चांदीच्या ईटीएफमधील उत्साह ओसरला सोन्या-चांदीच्या दरात मागील काही दिवसांत झालेली मोठी वाढ पाहता, ईटीएफमधील (ETF) गुंतवणुकीचा वेग काहीसा मंदावला आहे.

गोल्ड ईटीएफ: ३,७४२ कोटींची गुंतवणूक (ऑक्टोबरमध्ये ७,७४३ कोटी).

सिल्वर ईटीएफ: २,१५४ कोटींची गुंतवणूक (ऑक्टोबरमध्ये ३,४१२ कोटी).

वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यांत उद्योगाकडे ८.५४ लाख कोटी रुपयांचा ओघ आला आहे. 'छोटा एसआयपी' (Chota SIP) आणि वाढत्या सहभागामुळे पुढील वर्षी अंदाजे ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे,अशी माहिती एम्फीचे (AMFI) मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट चलसानी यांनी दिली आहे.

Updated : 11 Dec 2025 5:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top