Home > Business > MCX शेअरचा ऐतिहासिक विक्रम !

MCX शेअरचा ऐतिहासिक विक्रम !

पहिल्यांदाच ओलांडला 10,000 चा टप्पा, एका वर्षात गुंतवणूकदार मालामाल

MCX शेअरचा ऐतिहासिक विक्रम !
X

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (MCX)च्या शेअर्सने बुधवारी शेअरबाजारात नवा इतिहास रचला. कंपनीचा शेअर लिस्टिंगनंतर प्रथमच 10,000 रुपयांचा टप्पा ओलांडत इंट्राडेमध्ये तब्बल 10,250 रुपयांचा उच्चांक गाठला. सलग चौथ्या ट्रेडिंग सत्रात MCX मध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली.

दिवसभरातील कामगिरी

बुधवारी MCX चा शेअर 3.27% वाढीसह 10,190 रुपये या स्तरावर ट्रेड होत होता. याआधी 20 नोव्हेंबरला शेअरने 9,975 रुपयांचा उच्चांक केला होता, हा उच्चांक आज मोडीत निघाला.नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत शेअर्समध्ये 10% वाढ झाली असून, सलग तिसऱ्या महिन्यात या शेअरने मजबूत तेजी दाखवली आहे.

MCX'मल्टिबॅगर'

MCX च्या शेअरने गुंतवणूकदारांना भरपूर परतावा दिला आहे. या वर्षात आतापर्यंत शेअरने 62% परतावा दिला आहे. 11 मार्च 2025 रोजी हा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 4,410 वर होता. तिथून आतापर्यंत शेअरने तब्बल 130% वाढला आहे. 2024 मध्ये 95% आणि 2023 मध्ये 106% परतावा देत MCXने 'मल्टिबॅगर' ठरला आहे.

MCX ची आर्थिक स्थिती कशी आहे ?

कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. 2025-2026 च्या पहिल्या सहा महिन्यात कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा (Net Profit) 51% ने वाढून 400.66 कोटी झाला आहे, तर ऑपरेटिंग महसूल 44% ने वाढून 747.44 कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, भारताच्या कमोडिटी फ्युचर्स टर्नओव्हरमध्ये 98% मार्केट शेअर MCX चा आहे. तसेच मौल्यवान धातू (सोने-चांदी), बेस मेटल्स आणि एनर्जी सेगमेंटमध्ये कंपनीचा 100% वाटा आहे.

Updated : 26 Nov 2025 7:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top