Home > Business > INR vs USD डॉलर कमजोर होताच रुपया सुधारला

INR vs USD डॉलर कमजोर होताच रुपया सुधारला

शेअर बाजारातील तेजीने दिला नवा आधार

INR vs USD डॉलर कमजोर होताच रुपया सुधारला
X

जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरमध्ये झालेली घसरण आणि देशांतर्गत शेअर बाजारातील मजबुती यामुळे बुधवारी रुपयाला आधार मिळाला. सुरुवातीच्या सत्रातील घसरण भरून काढत भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २ पैशांनी मजबूत होत ८९.२० या पातळीवर पोहोचला.

चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते (Forex traders), देशांतर्गत बाजारात परकीय भांडवलाचा (FII) ओघ वाढल्यामुळे रुपयाला बळ मिळाले. तरीही, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती रुपयावर अंशतः दबाव निर्माण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक स्तरावर डॉलरची स्थिती मोजणारा डॉलर निर्देशांक (Dollar Index) ०.०२ टक्क्यांनी घसरून ९९.५६ वर आला. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय बाजारातील मानक असलेल्या ब्रेंट क्रूडच्या किमतीत ०.४० टक्क्यांची वाढ होऊन दर प्रति बॅरल ६२.७० डॉलरवर पोहोचला.

शेअर बाजारात तेजी

दुपारच्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली.निफ्टी 26,200 च्या जवळ पोहोचला तर सेन्सेक्स तब्बल ९०० अंकांनी वधारला

एफआयआयंच्या गुंतवणुकीचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. मंगळवारी परकीय गुंतवणूकदारांनी ७८५.३२ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

Updated : 26 Nov 2025 7:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top