भारताची निर्यात १० वर्षांच्या उच्चांकावर !
India's exports reach a 10-year high !
X
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्यात देशाच्या व्यापार तुटीमध्ये (Trade Deficit) लक्षणीय घट झाली असून, ती २४.५३ अब्ज डॉलर्सवर (सुमारे २.२२ लाख कोटी रुपये) आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत भारताची व्यापार तूट ३१.९३ अब्ज डॉलर्स (सुमारे २.८९ लाख कोटी रुपये) इतकी होती.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (Ministry of Commerce and Industry) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशाच्या आयातीत (Imports) वार्षिक आधारावर १.८८ टक्क्यांची घट झाली असून ती ६२.६६ अब्ज डॉलर्स (सुमारे ५.६८ लाख कोटी रुपये) इतकी नोंदवली गेली आहे.
दुसरीकडे, भारताच्या निर्यातीमध्ये (Exports) तब्बल २३.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये भारताने ३८.१३ अब्ज डॉलर्सची (सुमारे ३.४५ लाख कोटी रुपये) निर्यात केली असून, ही गेल्या १० वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे.
निर्यातीला कोणत्या क्षेत्रांचा हातभार ?
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अभियांत्रिकी वस्तू (Engineering Goods), इलेक्ट्रॉनिक्स, रत्ने आणि दागिने (Gems and Jewellery) तसेच औषधनिर्माण (Drugs and Pharma) या क्षेत्रांमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे निर्यातीत ही वाढ दिसून आली आहे. सोन्याच्या आयातीत ६०% घट सरकारी आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या आयातीत तब्बल ६० टक्क्यांची घट झाली आहे. सोन्याव्यतिरिक्त, पेट्रोलियम उत्पादने, खाद्यतेल (Vegetable Oil) आणि कोळसा यांच्या आयातीतही घसरण झाली आहे, ज्यामुळे व्यापार तूट कमी होण्यास मदत झाली.






