Home > Business > भारताची निर्यात ऑक्टोबरमध्ये 11.8% ने घसरली

भारताची निर्यात ऑक्टोबरमध्ये 11.8% ने घसरली

व्यापार तुटीचा आकडा 3.7 लाख कोटींच्या पुढे

भारताची निर्यात ऑक्टोबरमध्ये 11.8% ने घसरली
X

भारताच्या निर्यातीवर ऑक्टोबर महिन्यात दबावात आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशाची निर्यात 3.04 रूपये लाख कोटींवर घसरली असून, आयात 6.75 लाख रू. कोटींवर पोहोचली आहे. परिणामी, व्यापार तुटीचा आकडा तब्बल 3.70 लाख कोटींवर गेला आहे.

सोन्या-चांदीची आयात वाढली

आयात वाढण्यामागे सोने आणि चांदीच्या वाढलेल्या खरेदीचा मोठा वाटा आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोने आयात 43,600 कोटी होती; यावर्षी त्यात वाढ सोने-चांदीची आयात 1.30 लाख कोटींवर जाऊन पोहोचली . सोनं आणि चांदीच्या आयातीत जवळपास तीनपट वाढ झाली आहे.

अमेरिकेला होणारी निर्यातीत घट

व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांच्या माहितीनुसार, भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ऑक्टोबर महिन्यात 55,963 कोटींवर घसरली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा यापेक्षा जास्त होता.

एप्रिल ते ऑक्टोबर कालावधीचा आढावा

एप्रिल ते ऑक्टोबर कालावधीत आयातीत वाढ झाली आहे तर निर्यात घटली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत एकूण निर्यात 22.55 लाख कोटी झाली आहे तर

याच कालावधीत एकूण 39.98 लाख कोटींची आयात झाली आहे.

Updated : 17 Nov 2025 5:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top