Home > Business > India-Newzeland trade deal : भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक करार, जाणून घ्या करारातील ५ मोठे फायदे !

India-Newzeland trade deal : भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक करार, जाणून घ्या करारातील ५ मोठे फायदे !

India-New Zealand trade deal: India and New Zealand sign a historic agreement, learn about the 5 major benefits of the deal!

India-Newzeland trade deal : भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक करार, जाणून घ्या करारातील ५ मोठे फायदे !
X

भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. भारताने न्यूझीलंडसोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement - FTA) य

शस्वीरित्या पूर्ण केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी दूरध्वनीवरून या कराराची घोषणा केली

. केवळ ९ महिन्यांत पूर्ण झालेला हा करार भारताच्या 'विकसित भारत २०४७' या स्वप्नाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

भारताने आपल्या अटींवर हा करार केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी या करारात काय आहे, याचा हा सविस्तर आढावा :

१. भारतीय निर्यातीला 'शून्य शुल्क' (Zero Duty) प्रवेश

या कराराचा सर्वात मोठा फायदा भारतीय निर्यातदारांना होणार आहे. न्यूझीलंडने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क पूर्णपणे काढून टाकले आहे. याचा अर्थ असा की,

आता भारतातून न्यूझीलंडला जाणाऱ्या कापड (Textile), औषधे (Pharma), चामड्याच्या वस्तू, दागिने आणि इंजिनिअरिंग वस्तूंवर कोणताही टॅक्स लागणार नाही.

बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांशी स्पर्धा करणे भारतीय कपडा उद्योगाला सोपे जाईल. महाराष्ट्रातील इचलकरंजी आणि भिवंडी येथील टेक्स्टाईल उद्योगाला याचा थेट फायदा मिळू शकतो.

२. 'डेअरी' करारातून वगळली

सर्वात मोठी चिंतेची बाब होती ती म्हणजे न्यूझीलंडचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. न्यूझीलंड हा जगातील सर्वात मोठा दूध निर्यातदार देश आहे. जर त्यांचे दूध भारतात स्वस्तात आले असते, तर आपल्या स्थानिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असते.

भारताने या करारात दूध, दही, पनीर, लोणी आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांना करारातून वगळले (Negative List) आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर आणि कोल्हापूर पट्ट्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही.

सरकारने 'अमूल' आणि सहकारी संस्थांची बाजू भक्कमपणे लावून धरली आहे.

३. १.६ लाख कोटींची प्रचंड गुंतवणूक (Investment Boom)

केवळ व्यापारच नाही, तर न्यूझीलंडने भारतात मोठी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. पुढील १५ वर्षांत न्यूझीलंड भारतात सुमारे २० अब्ज डॉलर्स (म्हणजेच अंदाजे १ लाख ६६ हजार कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे.

ही गुंतवणूक प्रामुख्याने कोल्ड स्टोरेज (Cold Chain), फूड प्रोसेसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात येईल. महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणेसारख्या शहरांना यातून मोठे प्रकल्प मिळू शकतात.

४. विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी सुवर्णसंधी

न्यूझीलंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हा करार फायदेशीर ठरणार आहे.

सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स (STEM) शाखेत पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता शिक्षण पूर्ण झाल्यावर ३ वर्षांपर्यंत न्यूझीलंडमध्ये काम करण्याची परवानगी (Post-Study Work Visa) मिळेल.

याशिवाय, भारतीय व्यावसायिकांसाठी (डॉक्टर्स, नर्सेस, आयटी इंजिनिअर्स) ५,००० खास व्हिसा राखीव ठेवण्यात आले आहेत.

५. स्वस्त लाकूड आणि कोळसा

भारतातील बांधकाम आणि फर्निचर उद्योगाला लागणारे लाकूड (Wooden Logs) आणि कारखान्यांना लागणारा कोळसा (Coking Coal) आता न्यूझीलंडमधून स्वस्तात येईल. या वस्तूंवरील आयात शुल्क भारताने कमी केले आहे.

Updated : 22 Dec 2025 2:18 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top