Home > Business > रुपया अस्थिर असताना IMF कडून भारताच्या Exchange Rate पॉलिसीवर नवा निर्णय

रुपया अस्थिर असताना IMF कडून भारताच्या Exchange Rate पॉलिसीवर नवा निर्णय

रुपया अस्थिर असताना IMF कडून भारताच्या Exchange Rate पॉलिसीवर नवा निर्णय
X

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) लवकरच भारताच्या विनिमय दराच्या (Exchange Rate)व्यवस्थेच्या वर्गीकरणात बदल जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी IMF ने भारताचे चलनबाजारातील हस्तक्षेप जास्त असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असताना हा संभाव्य बदल होत आहे. गेल्या शुक्रवारी RBI ने हस्तक्षेप न केल्याने रुपया ऐतिहासिक नीचांकावर घसरला होता. मात्र सोमवारी केंद्रीय बँकेने पुन्हा हस्तक्षेप केल्यावर रुपयाचे अवमूल्यन काही प्रमाणात कमी झाले होते.

आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी IMF च्या काही निरीक्षणांवर वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. चलनातील जास्त अस्थिरता भारतासारख्या देशासाठी योग्य नाही,असं मत नुकतंच RBI च्या उप-गव्हर्नर पूनम गुप्ता यांनी व्यक्त केले होते.

आम्ही सर्व सदस्य देशांचे वास्तविक विनिमय दर व्यवस्थेचे वर्गीकरण एकाच पद्धतीने करतो. भारताचे नवीन वर्गीकरण 2025 च्या Article IV अहवालात बुधवारी प्रकाशित केले जाईल,अशी माहिती IMF च्या प्रवक्त्याने दिली आहे.

डॉलरविरुद्ध रुपया 4% घसरला

या वर्षी रुपया डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे 4% घसरला आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारताच्या निर्यातीवर ताण वाढला असून त्याचा प्रभाव रुपयावर दिसत आहे.आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्याच्या तुलनेत सध्याच्या काळात रुपयातील घसरण वाढली आहे. शक्तीकांत दास यांच्या काळात RBI ने मोठ्या प्रमाणावर राखीव निधी वापरून रुपयाचे अवमूल्यन थांबवले होते.

Updated : 25 Nov 2025 2:36 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top