Home > Business > Groww ने तोडले सर्व रेकॉर्ड, देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली !

Groww ने तोडले सर्व रेकॉर्ड, देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली !

IPO गुंतवणूकदार झाले श्रीमंत! एका आठवड्यात ७८% नफा

Groww ने तोडले सर्व रेकॉर्ड, देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी बनली !
X

स्टॉकब्रोकिंग प्लॅटफॉर्म Groww ची मूळ कंपनी बिलियनब्रेन गॅरेज व्हेंचर्स यांचा शेअर सलग चौथ्या दिवशी जोरदार वाढ झाली आहे. सोमवारी शेअरने 20% वाढत 178.23 रुपयांवर पोहचला. यामुळे Groww देशातील सर्वांत जास्त मूल्य असलेली सूचीबद्ध ब्रोकरेज कंपनी ठरली.

मार्केट कॅप 1.10 लाख कोटी

गेल्या चार सत्रांत Groww च्या शेअरमध्ये तब्बल ५९% वाढ झाली आहे. या जबरदस्त रॅलीमुळे कंपनीचे मार्केट कॅप थेट 1.10 लाख कोटींवर गेले आहे. Grow चे मार्केट कॅप Angel One, आनंद राठी, 5paisa, नुवामा आणि JM Financial यांच्या एकत्रित मार्केट कॅपपेक्षाही जास्त आहे.

IPO गुंतवणूकदार झाले श्रीमंत ! एका आठवड्यात ७८% नफा

Groww चा शेअर १२ ऑक्टोबरला बाजारात ₹131.3 वर लिस्ट झाला, जो IPO किंमत ₹100 पेक्षा 31% जास्त होता.

आता हा शेअर IPO किंमतीपेक्षा 78% वर ट्रेड होत आहे. त्यामुळे IPO मध्ये गुंतवणूक केलेल्यांना एका आठवड्यातच मोठा नफा मिळाला.

Groww IPO ला मजबूत प्रतिसाद

6,632 कोटींच्या Groww IPO ला ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.IPO ला एकूण 17.05 पट मागणी आली. उभारलेला पैसा कंपनी मार्केटिंग, तंत्रज्ञान, NBFC गुंतवणूक आणि विलीनीकरण यासाठी वापरणार आहे.

देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज कंपनी

2016 मध्ये सुरू झालेली Groww आज देशातील सर्वात मोठी स्टॉकब्रोकिंग कंपनी आहे. कंपनीकडे 12.6 दशलक्ष सक्रिय ग्राहक असून NSE वर तिचा हिस्सा 26% इतका आहे. Groww मध्ये सत्या नडेला, Y Combinator, Peak XV, Ribbit Capital, Tiger Global यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.

Updated : 17 Nov 2025 5:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top