Gold-Silver Price High सोन्याने ओलांडला १.५ लाखांचा टप्पा
बजेटपूर्वी चांदीचाही विक्रम
X
'चकाकते ते सर्व सोने नसते' असे म्हणतात, पण सध्या सोन्याची चकाकी जगभरातील गुंतवणूकदारांचे डोळे दिपवत आहे. १ फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Union Budget) तोंडावर सोन्या-चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे.
मंगळवारी जागतिक आणि भारतीय बाजारात मौल्यवान धातूंनी विक्रमी पातळी ओलांडली
जागतिक बाजारात स्पॉट गोल्डने $४,७२५ प्रति औंस आणि चांदीने $९५ प्रति औंसचा टप्पा ओलांडला.
तर भारतीय बाजारातील MCX वर सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम (१ तोळा) १,५०,००० च्या वर गेले आहेत, तर चांदीने प्रति किलो ३,२६,००० चा विक्रमी टप्पा गाठला आहे.
सोन्याचे दर का वाढले ?
ट्रम्प आणि 'ट्रेड वॉर'ची भीती या अभूतपूर्व तेजीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक भूमिका आहे. ट्रम्प यांनी 'ग्रीनलँड' खरेदी करण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत आणि फ्रान्स, जर्मनी व ब्रिटनसह आठ युरोपीय देशांवर आयात शुल्क (Tariffs)
लादण्याची धमकी दिली आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून १० टक्के आयात शुल्क लागू होण्याची शक्यता आहे आणि जूनपर्यंत ते २५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. याला प्रत्युत्तर म्हणून युरोपीय अधिकारी अमेरिकेच्या १०० अब्ज डॉलर्सच्या
वस्तूंवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे अमेरिका आणि युरोपमध्ये 'ट्रेड वॉर' (व्यापार युद्ध) भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
सोने आणि चांदी आता केवळ कमोडिटी राहिलेल्या नाहीत, तर त्या 'मेटल फॉर्म' मधील जिओपॉलिटिक्स (भू-राजकारण) बनल्या आहेत. जेव्हा महासत्ता ग्रीनलँडसारख्या संसाधनांवरून भांडतात,
तेव्हा बाजार जोखीम ओळखतो आणि गुंतवणूकदार सुरक्षिततेसाठी सोन्याकडे वळतात.
रुपयाच्या घसरणीचा दुहेरी फटका
जागतिक कारणांसोबतच भारतीय रुपयाची घसरण हे देखील सोन्याच्या दरवाढीचे प्रमुख कारण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ९१ च्या पातळीवर पोहोचला आहे.
भारतीय बाजारात दोन गोष्टींचा परिणाम दिसत आहे . एकीकडे जागतिक स्तरावर सोन्याचे वाढलेले भाव आणि दुसरीकडे रुपयाचे अवमूल्यन.
या दोन्ही गोष्टींमुळे स्थानिक गुंतवणूकदारांना परतावा जास्त मिळत असला तरी भाव गगनाला भिडले आहेत.
चांदीचे दर का वाढले ?
सोन्यापेक्षा चांदीची घोडदौड अधिक वेगवान आहे. खाणीतून होणारे मर्यादित उत्पादन आणि वाढती औद्योगिक मागणी यामुळे चांदीचा तुटवडा (Supply Crunch) निर्माण झाला आहे.






