Home > Business > Auto Sales Nov २०२५ : सणांनंतरही कार बाजारात मोठी तेजी ; ट्रॅक्टर विक्रीत रेकॉर्डब्रेक वाढ

Auto Sales Nov २०२५ : सणांनंतरही कार बाजारात मोठी तेजी ; ट्रॅक्टर विक्रीत रेकॉर्डब्रेक वाढ

Auto Sales Nov 2025: Big boom in car market even after festivals; Record-breaking increase in tractor sales

Auto Sales Nov २०२५ : सणांनंतरही कार बाजारात मोठी तेजी ; ट्रॅक्टर विक्रीत रेकॉर्डब्रेक वाढ
X

सणासुदीचा काळ संपला तरी भारतीय ग्राहकांचा नवीन गाडी खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्स (FADA) ने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात पॅसेंजर व्हेईकल (प्रवासी वाहने/कार) विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाली आहे.विशेष म्हणजे, लग्नसराईचा हंगाम, जीएसटीचे (GST) फायदे आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) गाड्यांची वाढती मागणी यामुळे ही तेजी दिसून आली आहे.

कार विक्री सुसाट, पण टू-व्हीलरची गती मंदावली

फाडाचे (FADA) अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये ३,९४,१५२ प्रवासी वाहनांची विक्री झाली, जी मागील वर्षी याच काळात ३,२९,२५३ इतकी होती. डीलर्ससाठी अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे, वाहनांचा साठा (Inventory) जो आधी ५३-५५ दिवसांचा होता, तो आता ४४-४६ दिवसांवर आला आहे. यामुळे मागणी आणि पुरवठा यात ताळमेळ बसण्यास मोठी मदत झाली आहे.

एकीकडे कार विक्रीत तेजी असताना, दुसरीकडे दुचाकी (Two-wheelers) आणि बांधकाम उपकरणांच्या (Construction Equipment) विक्रीला मात्र ब्रेक लागला आहे.

टू-व्हीलर विक्री : ३ टक्क्यांनी घट

बांधकाम उपकरणे : १७ टक्क्यांनी घट

व्यावसायिक वाहने (CV): २० टक्के वाढ

तीन चाकी वाहने: २४ टक्के वाढ

ट्रॅक्टर: ५७ टक्क्यांची भरघोस वाढ (ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत शुभ संकेत)

एकंदरीत विचार करता, सर्व प्रकारच्या वाहनांची किरकोळ विक्री (Retail Sales) नोव्हेंबरमध्ये २ टक्क्यांनी वाढून ३३ लाखांवर पोहोचली आहे.

सणांनंतरही बाजारात तेजी का ?

साधारणपणे दिवाळीनंतर गाड्यांच्या विक्रीत थोडी मंदी (slowdown) येते, पण यावर्षी तसे झाले नाही. विघ्नेश्वर यांनी स्पष्ट केले की, "यंदा बहुतेक सणासुदीची खरेदी ऑक्टोबरमध्येच पूर्ण झाली होती. तरीही नोव्हेंबरने जुने ट्रेंड मोडीत काढले. याचे प्रमुख कारण म्हणजे जीएसटी दरातील कपात आणि कंपन्यांनी (OEMs) दिलेले डिस्काऊंट ऑफर्स. यामुळे ग्राहकांची पावले शोरूमकडे वळली. लग्नसराईमुळे आणि नवीन मॉडेल्सच्या उपलब्धतेमुळे ही मागणी टिकून राहिली. विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि पर्यटनामुळे व्यावसायिक वाहनांनाही चांगली मागणी आली आहे.

Updated : 8 Dec 2025 1:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top