Home > Business > 'सुटबुटवाले' तुमचं पाकीट मारतायेत ? शंकर शर्मांचा खळबळजनक दावा !

'सुटबुटवाले' तुमचं पाकीट मारतायेत ? शंकर शर्मांचा खळबळजनक दावा !

Are 'suit-wearers' stealing your wallet? Shankar Sharma's sensational claim!

सुटबुटवाले तुमचं पाकीट मारतायेत ? शंकर शर्मांचा खळबळजनक दावा !
X

शेअर बाजारात सध्या दिसणारी हिरवीगार तेजी (Bull Run) तुम्हाला भुरळ घालत असेल, तर जरा थांबा. ही तेजी म्हणजे तुमची श्रीमंती नाही, तर तुमची 'लूट' आहे, असा खळबळजनक दावा दिग्गज मार्केट विश्लेषक शंकर शर्मा यांनी केला आहे. त्यांनी सध्याच्या बाजाराचे वर्णन "गरिबांकडून श्रीमंतांकडे होणारे इतिहासातील सर्वात मोठे कॅश ट्रान्सफर " असे केले आहे.

सामान्य गुंतवणूकदाराचा पैसा ओढून आधीच गब्बर असलेल्या 'सुटबुटवाल्यांना' आणखी श्रीमंत करण्याचा हा खेळ कसा सुरू आहे ?

'सुटबुटवाले' नक्की कोण ?

शंकर शर्मा यांच्या मते, या तेजीचा फायदा सामान्य माणसाला न होता, बाजारातील मोठ्या माशांना होत आहे. यात खालील लोकांचा समावेश आहेत

१. कंपनीचे प्रवर्तक (Promoters)

२. संस्थापक (Founders)

३. व्हेंचर कॅपिटलिस्ट (VCs)

४. प्रायव्हेट इक्विटी फंड्स (PE Firms)

५. संपत्ती व्यवस्थापक (Asset Managers)

शर्मा म्हणतात, "हे लोक अत्यंत हुशारीने आपला हिस्सा विकून बाजूला होत आहेत आणि सामान्य गुंतवणूकदार मात्र भावनेच्या आहारी जाऊन चढ्या भावात शेअर्स खरेदी करत आहेत."

आयपीओ की लुटीचा सापळा ?

या लुटीचे मुख्य हत्यार म्हणजे २०२५ सालातील आयपीओची (IPO) लाट.

यावर्षी बाजारात आलेले बहुतांश आयपीओ हे 'ऑफर फॉर सेल' (OFS) स्वरूपाचे आहेत.

'ऑफर फॉर सेल'मध्ये आयपीओचा पैसा कंपनीच्या विकासासाठी वापरला जात नाही. तर, कंपनीचे जुने मालक आणि सुरुवातीचे गुंतवणूकदार (Promoters & VCs) आपले शेअर्स विकून स्वतःची झोळी भरतात.

एकूणच कंपनीचे मालक 'एक्झिट' घेत आहेत आणि सामान्य गुंतवणूकदार तिथे 'एन्ट्री' घेत आहेत. म्हणजेच, जोखीम आता श्रीमंतांकडून गरिबांच्या माथी मारली जात आहे.

Updated : 9 Dec 2025 3:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top