Home > Business > Adani Group Shares Rise : क्लीनचीटनंतर अदानी समूहासाठी गुड न्यूज

Adani Group Shares Rise : क्लीनचीटनंतर अदानी समूहासाठी गुड न्यूज

अमेरिकास्थित हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेनं भारतातील अदानी समूहाच्या विविध कंपन्यांवर आर्थिक अनियमिततेसह अनेक गंभीर आरोप एका अहवालाद्वारे केले होते. मात्र, चार महिन्यानंतर या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे.

Adani Group Shares Rise : क्लीनचीटनंतर अदानी समूहासाठी गुड न्यूज
X

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenberg Research organisation) या संस्थेनं भारतातील अदानी समूहाच्या विविध कंपन्यांवर आर्थिक अनियमिततेसह अनेक गंभीर आरोप एका अहवालाद्वारे केले होते. मात्र, चार महिन्यानंतर या कंपन्यांच्या समभागांमध्ये 19 टक्के वाढ झालीय.

सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) नियुक्त केलेल्या समितीनं अदानी समूहाच्या दहा कंपन्यांमध्ये प्रथमदर्शी स्टॉक्स (Adani Stocks) च्या किंमतीमध्ये हेराफेरी केल्याचं आढळून येत नसल्याचं स्पष्ट करत क्लीन चीट दिलीय. बाजार नियमन करणा-या सेबी (SEBI) या संस्थेकडूनही याप्रकरणाची चौकशी सुरू होती,

अहमदाबाद (Ahmedabad) इथल्या स्टॉक ब्रोकर्सनी (Stock Brokers) सांगितले की, सोमवारचा दिवस हा अदानी समूहाच्या (Adani Group) स्टॉक्स साठी सर्वात चांगला दिवस होता. याच दिवशी अदानी समूहाचे शेअर्स (Adani Group Shares) 18.84 टक्के इतकी वाढ झाली होती. अदानी विल्मर (Adani Wilmer) मध्ये 10 टक्के, अदानी पोर्ट्स (Adani Ports) मध्ये 6 टक्के, अंबुजा सिमेंट (Ambuja Cements) 5 टक्के, अदानी पॉवर (Adani Powers) 5 टक्के, अदानी ट्रान्समिशन (adani transmission) 5 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) मध्ये 5 टक्के तर एनडीटिव्ही (NDTV) मध्येही 5 टक्के वाढ झालीय. अदानी समूहाच्या दहा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये झालेल्या वाढीमुळे या कंपन्यांचं बाजारमूल्य 10,16,212.15 कोटी रूपये झाले. एकूणच काय तर अदानी समूहाच्या या दहा कंपन्यांचं बाजारमूल्य हे १ लाख कोटींपेक्षा अधिक झाले होते. त्याला कारण ठरलं ते शुक्रवार आणि सोमवारी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली वाढ.

सर्वोच्च न्यायालयानं माजी न्यायाधीश ए एम सप्रे (Justice AM Sapre) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीनं अदानी समूहाच्या कंपन्यांविरोधातील आरोपांची चौकशी करत 173 पानांचा अहवाल सादर केला. यात सेबी (stock market regulator Securities and Exchange Board of India) ने म्हटलंय की, अदानी समूहानं कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नसल्याचं सिद्ध होत आहे. याप्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी न्यायालयानं १४ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे, तर याप्रकरणाची पुढील सुनावणी ही ११ जुलै रोजी होणार आहे.

Updated : 23 May 2023 5:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top