शाहीनबाग : मध्यस्थांचा अहवाल कोर्टात सादर

Update: 2020-02-24 08:37 GMT

शाहीनबागमधील CAA विरोधातल्या आंदोलनाविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी नियुक्त केलेल्या मध्यस्थांच्या समितीनं सोमवारी आपला अहवाल बंद पाकिटात सादर केला. मध्यस्थ समितीमधील ज्येष्ठ वकील साधना रामचंद्रन आणि संजय हेगडे यांनी आपला अहवाल न्यायमूर्ती एस.के.कौल आणि के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठापुढे सादर केला. यानंतर कोर्टानं अहवालाचा अभ्यास करुन २६ फेब्रुवारीला सुनावणी घेणार असल्याचं सांगितले. शाहीनबागमधील आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून नागरिकांना विनाकारण याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं सांगत याविरोधात कोर्टात याचिका दाखल कऱण्यात आल्या आहेत. त्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान आंदोलकांशी चर्चेसाठी कोर्टानं मध्यस्थांच्या समितीची नियुक्ती केली होती.

Similar News