CoronaVirus वाचा... कोणी घालावं मास्क ?

Update: 2020-03-22 00:16 GMT

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये एकच चित्र पहायला मिळलंय. रस्त्यावरून चालणारा प्रत्येक व्यक्ती हा मास्क घालून फिरताना दिसतोय. मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये तर, जवळपास सर्वच तोंडाला मास्क लावून बसलेले पहायला मिळतायत.

कोविड-१९ म्हणजे कोरोना या आजारामुळे भारतात रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचलीये. लोकांच्या मनात भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे. आपल्याला कोरोना होईल या भीतीने सर्व प्रवासी मास्क वापरण्याची खबरदारी घेत आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मास्क कोणी वापरायचं याबाबतची माहिती जारी केलीये.

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,
  • सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेण्यात अडथळा असणाऱ्या व्यक्तींनी
  • कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्यांनी
  • संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांसोबत असलेल्यांनी
  • श्वसनाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांची काळजी घेणाऱ्या नर्स, डॉक्टरांनी
  • मास्क कसं वापरावं
  • मास्क दर सहा तासांनी बदलावं
  • मास्क लावल्यानंतर त्याला हात लावू नये
  • मास्क काढताना बाहेरील बाजूला स्पर्श करू नये
  • मास्क गळ्याभोवती लटकवून ठेवू नये
  • मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धूवून घ्यावे

सौजन्य : माय मेडिकल मंत्रा

Similar News