मुख्यमंत्री साहेब ख्रिश्चन समाजाच्या मागण्या केव्हा मान्य करणार ?

Update: 2019-08-25 11:41 GMT

भारतात पाच कोटी भारतीय ख्रिश्चन समाज राहतात. त्यात महाराष्ट्रात 30 लाख ख्रिश्चन समाज बांधव आहेत. ख्रिश्चन समाजाच्या ही काही मूलभूत अडचणी आहेत.त्या अडचणी सोडविण्यासाठी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर तिन व जंतर मंतर दिल्ली येथे एक तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या तिन वेळा भेटी घेवून ख्रिस्ती समाजाच्या अडचणी व समस्या सांगितल्या. पण अद्याप एक ही मागणी मान्य झालेली नाही. हे खेदाने सांगावे लागेल. जवळपास सर्वच समाजाच्या मागण्या सरकारने अंशतः मान्य केलेल्या आहेत परंतु सबका साथ,सबका विकास और सबका विश्वास हे ब्रीद सांगणारे अल्पसंख्खाक ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत एवढे नाराज का ? आमच्या मागण्या आपण कधी मान्य करणार ? असा सवाल अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी महाजनादेश याञेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारे देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

ख्रिश्चन समाजाच्या या आहेत मागण्या

1)भारतरत्न मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करा.

2)महाराष्ट्र अल्पसंख्खाक आयोग व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष पद ख्रिस्ती समाजास द्यावे.

3)देश भरात ख्रिश्चन समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी अँट्रासिटी अँक्ट लागू करणे.

4))ख्रिस्ती समाजासाठी प्रत्येक गावात कब्रस्थानासाठी जागा द्यावी व जून्या कब्रस्थानाचा विकास करावा.तसेच इतर धर्मिय स्थळाप्रमाणे चर्चच्या विकासासाठी विशेष निधी द्यावा.

5)विधवा,अनाथ व वंचितांसाठी आयुष्य वेचलेल्या पंडिता रमाबाई यांना भारतरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकार ला शिफारस करण्यात यावी.

6)भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्मदिवस "सेवा दिन " म्हणून सरकारने जाहीर करून शासन स्तरावर साजरी करावी.

Similar News