विजय माल्या प्रकरणातील कागदपत्र गायब...

Update: 2020-08-06 09:40 GMT

भारतीय बॅंकाना हजारो कोटींचा चुना लावून प्रसार झालेला विजय मल्याची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. त्याच्यावर 17 बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे. न्यायालयाचा अवमान केला म्हणून त्याच्या विरोधात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र, या खटल्याची कागद पत्र फाइल मधून गायब झाल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलली आहे. विजय माल्या सध्या लंडन येथे राहत आहे.

विजय माल्या 2 मार्च 2016 ला कोणालाही खबर लागू न देता देशाबाहेर पळाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून त्याच्यावर अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या संदर्भात माल्याने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

मात्र, कागदपत्रे गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने ही सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढककली आहे. तीन वर्षांपूर्वी मल्याने ही याचिका दाखल केली होती.

Similar News