उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यामध्ये गुप्त बैठक कशासाठी?

Update: 2020-04-28 02:54 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आणि अजित पवार यांची एक गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत मंत्रीमंडळात घेतलेल्या निर्णयांची माहिती अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. तसंच कोरोना संदर्भातील उपाययोजना बाबतही चर्चा झाली.

मात्र, या बैठकीचं सर्वात मोठ कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पद घटनात्मक पेचात अडकले आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांना राज्यपालाच्या कोट्यातून आमदार करा. अशी शिफारस अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाच्या बैठकीत दुसऱ्यांदा राज्यपालांकडे पाठवली आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच ही बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे ही उपस्थित होते.

आता चेंडू राज्यपालांच्या कोर्टात आहे...

कोणत्याही नेत्याने मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्या मंत्र्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचं सदस्य व्हावं लागतं. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात त्यांना विधानसभा आणि विधानपरिषदेचं सदस्य होणं गरजेचं आहे. मात्र, कोरोना व्हायरस चा देशात प्रकोप सुरु असल्यानं राज्यात कोणतीही निवडणूक होणार नाही. अशा परिस्थितीत राज्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.

त्यामुळं महाविकास आघाडी ने राज्यपाल कोट्यातील रिक्त असलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांची निवड करावी. असा ठराव मंत्रीमंडळाच्या बैठकीत दुसऱ्यांदा पार करुन राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळं या सगळ्या घडामोडी घडत असताना दुसऱ्यांदा पाठवलेल्या ठरावावर राज्यपाल नक्की कोणता निर्णय घेतात. हे पाहणं महत्वाचं आहे.

Similar News