आकाशात उडतोय पाखरांचा थवा, आज सोशल मीडियावर फक्त मोदी-ट्रम्प जोडीचीच हवा

Update: 2020-02-24 10:58 GMT

देशात एखादी महत्वाची घटना घडली आणि त्याचं प्रतिबिंब सोशल मीडियावर उमटलं नाही, असं होत नाही. त्यातच राजकारण म्हटलं की, भारतीयांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या विमानतळावर त्यांचं स्वागत केलं.

ट्रम्प यांनी भारतात पाऊल ठेवलं आणि इकडं सोशल मीडियावर धुराळा उडायला सुरूवात झाली. विमानतळावर ट्रम्प-मोदी यांची गळाभेट असो, मेलेनिया ट्रम्प आणि मोदींचं ‘शेकहॅंड’ असो, नेटकऱ्यांच्या नजरेतून काहीच सुटलं नाही.

विमानतळावरून मोदी-ट्रम्प यांचा ताफा मोटेरा स्टेडीयमकडे जसाजसा वेग घेत होता, त्यापेक्षा जास्त वेगाने इकडं MEMES बनत होते. तिकडे ट्रम्प चरखा चालवत होते आणि इकडं MEMERS आपली क्रिएटीव्हीटी. मोदी-ट्रम्प यांच्या प्रत्येक कृतीला नेटकऱ्यांनी आपल्या क्रिएटीव्हीटीने ‘चार चांद’ लावत व्यक्त केलंय. एकंदरितच ट्रम्प यांचा भारत दौरा, त्यासाठी मोदींची असलेली एक्साईटमेंट हे सगळं या MEMES मध्ये उतरलंय.

आजच्या पहिल्या दिवसात विमानतळावरचं स्वागत, रोड शो, साबरमती आश्रमाला भेट, मोटेरा स्टेडीयममधली भाषणं एवढा सगळा कंटेट मिळाला आहे. आणखी आजची रात्र आणि उद्याचा दिवस उरलाय आहे. म्हणजे ‘पिक्चर अभी बाकी हैं

हे काही खास MEMES तुमच्यासाठी, मजा करा....

 

Full View

Full View

Full View

Full View

Full View

Full View

Similar News