गोवंश हत्याबंदी कायदा आणखी कठोर, उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय

Update: 2020-06-10 01:57 GMT

योगी आदित्यनाथ सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा आणखी कठोर करण्यासाठी कायद्यात सुधारणा केला आहेत. या सुधारणांना राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यापुढे गोहत्या केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे गायींना इजा केल्यास ७ वर्षे तुरुंगवास आणि ३ ते ५ लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसंच सध्या विधिमंडळाचे अधिवेशन नसल्याने अध्यादेश जारी करण्यात येणार आहे. या सुधारणांमुळे गायींचे संरक्षण करण्यास मदत होणार आहे आणि गायींच्या अवैध वाहतुकीला आळा बसेल, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

हे ही वाचा..

Similar News