मोठी बातमी : सरपंचाची निवड आता सदस्यांमधून...

Update: 2020-01-29 13:45 GMT

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा धक्का दिला. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज हा निर्णय रद्द करण्यात आला.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत संरपंचाची निवड पुर्वीप्रमाणेच घेण्याचा निर्णय झाला. सरपंचांची निवड लोकांमधून थेट निवडणुकीऐवजी आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम 7, कलम 13, कलम 15, कलम 35, कलम 38, कलम 43, कलम 62, कलम 62अ मध्ये सुधारणा व कलम 30अ-1ब व कलम 145-1अ चा नव्याने समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याशिवाय खर्चाच्या विवरणाच्या संदर्भात सुधारीत वेळापत्रकात बदल करण्यास मंजूरी देण्यात आली. संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल.

Similar News