धक्कादायक ! राज्यात १ वर्षात ५ हजार ४१२ महिलांवर अत्याचार

Update: 2020-03-05 11:49 GMT

गेल्या काही वर्षामध्ये राज्य सरकारने महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने कितीही कायदे केले तरी, राज्यातील महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये 2019 मध्ये 5 हजार 412 महिलांवर बलात्कार झाले होते. 2018 मध्ये राज्यात बलात्कारांच्या 4 हजार 974 गुन्हांची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे राज्याच बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते.

महिला विनयभंग, अपहरण, पळून नेणे, हुंडाबळी, पती व नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्य, लैगिंक अत्याचार, अनैतिक व्यापार या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2019 मध्ये या प्रकारच्या 37 हजार 576 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तर 2018 मध्ये याच प्रकरणी 35 हजार 497 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

 

Similar News