शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक; ‘या’ विषयांवर होईल चर्चा

Update: 2020-02-17 05:00 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयकडे सोपविण्यास मान्यता दिली, त्यावर शरद पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलीय. केंद्र सरकारने परस्पर हा तपास स्वत:कडे घेणं चूकीचं आहे. त्याशिवाय राज्याने त्याला मान्यता देणं हे अधिक चुकीचं असून राज्याने याचा स्वतंत्र तपास करावा असं मत शरद पवार यांनी मांडलं आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

यासोबतच २४ फेब्रवारीपासून सुरु होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्तानेही राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते.

Similar News