राहुल गांधी 2024 चे पंतप्रधान पदाचे उमेदवार, काँग्रेस नेत्याने केले सूतोवाच

Update: 2022-12-31 04:32 GMT

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन राहुल गांधी यांनी सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र आता 2024 मध्ये राहुल गांधी हेच काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा चेहरा असणार आहेत, याबाबत काँग्रेसच्या बड्या नेत्याने सूतोवाच केले आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीत न उतरण्याचा निर्णय घेऊन राहुल गांधी यांनी मोठा धक्का दिला होता. मात्र आता 2024 मध्ये राहुल गांधी हेच काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा चेहरा असणार आहेत, असे सूतोवाच काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केले आहे.

कमलनाथ म्हणाले, या देशासाठी जेवढं बलिदान काँग्रेसने दिलं आहे. तेवढं बलिदान अन्य कोणत्याच पक्षाने दिलं नाही. एवढंच नाही तर इतिहासात आजपर्यंत कुणीही भारत जोडो यात्रेसारखी पदयात्रा काढली नाही. राहुल गांधी हे सत्तेसाठी नाही तर जनतेसाठी राजकारण करतात आणि जनता कुणालाही सत्तेत बसवू शकते. 2024 मध्ये राहुल गांधी हे फक्त विरोधी पक्षाचे चेहरा असणार नाहीत तर पंतप्रधान पदाचे उमेदवारदेखील असतील, असं म्हणत 2024 च्या निवडणूकीसाठीची रणनिती काँग्रेस नेते कमलनाथ यांनी स्पष्ट केली.

Tags:    

Similar News