PMC बॅंकेच्या खातेधारकांना दिलासा; ५०,००० रुपये काढता येणार

Update: 2019-10-23 12:28 GMT

23 सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाद्वारा (RBI) पंजाब आणि महाराष्ट्र कॉ.ऑपरेटिव्ह बँकेवर (PMC Bank) निर्बंध लादण्यात आले होते. या निर्बंधानंतर बँक खाते धारकांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होत. याविरोधात अनेक आंदोलनं आणि निदर्शनेही करण्यात आली होती.

यानंतर आरबीआयने खातेदारांना 40 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास मुभा दिली आहे. आता पुन्हा काही विशेष बाबींसाठी 50 हजार रुपये काढण्याची सवलत बँकेद्वारे देण्यात आली आहे. याविषयी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन पोस्त शेअर केली आहे.

https://twitter.com/KiritSomaiya/status/1186836894513893376

यामध्ये शिक्षणासाठी आणि वैद्यकीय खर्चांसाठी 50 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येऊ शकते. परंतु वैद्यकीय उपचारासाठी ही रक्कम काढण्यापूर्वी बँकेत मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल बील इत्यादी माहिती पुरवणे गरजेचे आहे. शिक्षणासंबंधीही अशीच माहिती देणं आवश्यक आहे. बँकेने आपल्या खातेधारकांना त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याचा दिलासा दिला आहे.

Similar News