Covid Vaccine : कुणाला मिळणार लस, पंतप्रधानांनी जाहीर केला कार्यक्रम

कोरोनावरील लसीकरणाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जाहीर केला आहे.

Update: 2021-01-11 12:24 GMT

कोरोनावरील लस भारतीयांना कधीपासून मिळणार याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देशातील कोरोनायोद्धे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात ३ कोटी कोव्हीड योद्धे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांची व्हर्च्युअल बैठक झाली आहे.

या बैठकीत पंतप्रधानांनी कोरोनावरील लसीसंदर्भात माहिती दिली. पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देशातील ५० वर्षांवरील २७ कोटी नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या ५० वर्षांच्या आतील नागरिकांना लस दिली जाणार आहे. आपत्कालीन वापराची परवानगी दिलेल्या २ मेड इन इंडिया लसींच्या माध्यमातून जगातील सगळ्यात मोठी लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली आहे. जगभरातील इतर लसींपेक्षा भारतात तयार झालेल्या लसी स्वस्त आहेत असे त्यांनी सांगितले. दरम्यान ३ कोटी आरोग्यकर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार कऱणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे.

Full View


Tags:    

Similar News