मनसेची वाटचाल वेगळ्या दिशेने?

Update: 2020-01-17 08:09 GMT

येत्या २३ तारखेला बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंती दिनी मनसे (MNS) च्या अधिवेशनात राज ठाकरे (Raj Thackeray) पक्षाची पुढील वाटचाल जाहीर करणार आहेत. पण त्याआधी मनसेनं शिवसेना (Shivsena) भवनाबाहेर लावलेल्या पोस्टरमधून मनसेची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे याचे संकेत मिळू लागले आहेत.

या पोस्टरमध्ये ‘सत्तेसाठी सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मासाठी एकच सम्राट’, असा मजकूर लिहिण्यात आलाय. विशेष म्हणजे या पोस्टरवर फक्त भगव्या रंगावर हा मजकूर लिहिण्यात आलाय पण मनसेचा झेंडा कुठेही दिसत नाहीये, त्यामुळे मसनेचा झेंडा बदलणार असल्याच्या चर्चेला यामुळे आणखी बळ मिळालंय.

हे ही वाचा...

तर दुसरीकडे शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेनं आता थेट शिवसेनेला आव्हान दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे भाजपसोबत जाणार का अशीही चर्चा आता सुरू झालीये.

Similar News