पंतप्रधान मोदींच्या आणखी एका भाषणाला likes पेक्षा जास्त dislikes

Update: 2020-09-07 12:53 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्या सलग दुसऱ्या भाषणाला पुन्हा एकदा likesपेक्षा जास्त diskiles आलेले आहेत. सोमवारी नवीन शैक्षणिक धोरणावर देशातील सर्व राज्यपालांचा एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (ramnath kovind )सहभागी झाले होते. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणालाही सोमवारी likes पेक्षा जास्त dislikes मिळाले. भाजपने (BJP) आपल्या पेजवर हे भाषण दाखवल्यानंतर त्याला सोमवारी संध्याकाळी ५.५० पर्यंत ४ हजार लाईक्स आणि ३१ हजार डिसलाईक्स होते.

दरम्यान यावर अनेकांनी काही कॉमेंट्स टाकल्या आहेत. त्यामधून तरुणांचा सरकारवरचा राग दिसतोय.

गेल्या रविवारी झालेल्या पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमालाही मोठ्या प्रमाणात डिसलाईक्स मिळाले होते. JEE आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशभरातील विद्यार्थी करत होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काही तरी बोलतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख न केल्याने अनेकांनी टीका करत डिसलाईक केले होते

Similar News