मनसे महामोर्चा : मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Update: 2020-02-08 16:47 GMT

देशातील बेकायदेशीर पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईच्या आझाद मैदान येथे महामोर्चा (MNS MahaMorcha) निघणार आहे. महाराष्ट्रभरातुन या मोर्चासाठी मनसैनिक मोठ्या प्रमाणात हजर राहणार असुन शहरात सुरक्षेच्या कारणास्तव कडकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वात आयोजित या महामोर्चाची सुरुवात १२ वाजता हिंदु जिमखाना येथुन होणार असुन गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असं मोर्चाचं मार्गक्रमण असणार आहे. आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल.

Similar News