डोंबिवलीत सुटकेसमध्ये मृतदेह सापडल्याच्या गुन्ह्याचा उलगडा

Update: 2020-02-07 14:27 GMT

डोंबिवलीत गुरुवारी बावन्न चाळ परिसरामध्ये सुटकेसमध्ये मृतदेह सापडला होता. प्राथमिक तपासानंतर हा मृतदेह मुंबई सत्र न्यायालयात स्टेनो म्हणून निवृत्त झालेल्या उमेश पाटील यांचा निघाला. डोबिंवली पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले आणि काही तासात या प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांनी या हत्येप्रकऱणात आरोपी प्रफुल पवार याला बेड्या ठोकल्या आहे. मृतक उमेश पाटील, वय ५८ वर्षे, याचा डोंबिवलीच्या कोपर भागात राहणाऱ्या प्रफुल्ल पवार याच्यासोबत समलिंगी संबध होते. नेहमीप्रमाणे ४ फेब्रुवारीला उमेश प्रफुल्लच्या घरी आला आणि त्याच्याकडे समलैंगिक संबधाची मागणी केली. मात्र नुकतंच लग्न झालेल्या प्रफुल्लने उमेशची मागणी झिडकारली. तसंच यापुढं समलैंगिक संबध ठेवणार नसल्याचं स्पष्ट केलं.

मात्र नकार मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या उमेश पवार यांनी प्रफुलच्या पत्नीला या संबधाविषयी माहिती सांगण्याची धमकी दिली. आपलं बिंग फुटेल या भितीने प्रफुल्लने उमेशची गळा दाबून हत्या केली. आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरुन बावन्न चाळ परिसरात फेकुन दिला.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/164993421613569/

Similar News