चैत्य भूमीवरील अभिवादनावरून भाजपने उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडलं

Update: 2019-12-05 13:55 GMT

सहा डिंसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr. Babasaheb Ambedkar) यांचा महापरिनिर्वाण दिन. या दिवशी आंबेडकरी अनुयायी अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येतो. पण याच बरोबर प्रत्येक राजकीय पक्षाचे नेतेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात. याच मुद्यावरून भाजपने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कोंडींत पकडलं आहे.

उद्धव ठाकरे चैत्यभूमिवर जाऊन अभिवादन करतील का? असा सवाल भाजपचे जेष्ठ नेते करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आतापर्यंतच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आंदराजली वाहिली आहे. पण याला उद्धव ठाकरे हे अपवाद ठरले आहेत.

शिवाजी पार्कच्या भव्य शपथविधी सोहळ्यानंतर उध्दव ठाकरे अभिवादन करण्यासाठी गेले नाहीत. त्याच बरोबर चैत्याभूमीवर लाखोंच्या संख्येने येणा-या आंबेडकरी अनुयायासाठी राज्यसरकार कडून आढावा बैठक घेण्यात येते. त्या बैठकीतही उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. नेमका हाच मुद्दा उपस्थित करून भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गेले होते आणि प्रत्येक वर्षी राज्यसरकारच्या आढावा बैठकीत होते. असं गिरकर यांनी सांगितलं होतं. 1978 साली बाळासाहेब ठाकरे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासठी गेले होते. त्यानंतर मात्र, ठाकरे परिवारातील कोणीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गेलेला नाही.

आता उध्दव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने प्रत्येक मुख्यमंत्री या दिवशी अभिवादन करण्यासाठी जात असतात. त्यामुळे नव्यानं सूत्र हाती घेतलेले उध्दव ठाकरे चैत्यभूमीवर जाणार की नाही? हे अजून स्पष्ठ झालेलं नाही.

या संदर्भात आम्ही उध्दव ठाकरे यांचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांच्याशी मेसेज द्वारे संपर्क साधला असता त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Similar News