महाराष्ट्र बंद! CAA विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

Update: 2020-01-24 05:33 GMT

आज राज्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. एनआरसी (NRC) आणि सीएए (CAA) आणि देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या महाराष्ट्र बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. राज्यभरातील एकुण ३५ संघटना बंदमध्ये सहभागी आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनीच बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला होता. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे.

“देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. देशातील तरुणांचं भविष्य सुरक्षित नाही. देश हा अराजकतेच्या वाटेवर आहे. बँकेतले पैसे सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत या देशाला सरकार दारुड्यासारखं चालवत आहे.” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

Similar News