कोरेगाव भीमा: आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Update: 2020-03-16 14:05 GMT

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात कथित आरोप असलेले आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांचा आज (16 मार्च ला) सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे. गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयाने गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेला स्थगिती दिली होती.

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला दंगल झाली होती. या दंगली मागे ३१ डिसेंबर २०१८ ला पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेतील काही नेत्यांचा हात होता असा आरोप आहे. त्यानुसार जानेवारी २०१८ मध्ये गौतम नवलखा आणि इतर चौघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. एल्गार परिषदेत नेत्यांनी दिलेल्या चिथावणीखोर भाषणांनंतरच कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

हे ही वाचा...

त्यानंतर या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना त्यांचे पासपोर्ट पोलिसांकडे तात्काळ जमा करण्याचे आदेश देत पुढील 3 आठवड्याच्या आत स्वत: हून पोलिसाच्या स्वाधीन होण्याचे आदेश दिले.

Similar News