इराणचा अमेरिकी लष्करी तळांवर हल्ला

Update: 2020-01-08 04:55 GMT

इराण आणि अमेरिकेमध्ये युद्धाची ठिणगी पडलीये, इराणनं इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर क्षेपणास्त्र डागत हल्ला केलाय. अमेरिकेनंही याला दुजोरा दिलाय. पण इराणनं अमेरिकेचे ३० सैनिक मारले गेल्याचा दावा केलाय. अमेरिकेकडून अजून या मनुष्यहानीला दुजोरा देण्यात आलेला नाही.

हे ही वाचा...

कशी होते फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी ?

जेएनयूमध्ये जाऊन दीपिकानं दिला विद्यार्थ्यांना पाठिंबा

निर्भया प्रकरणी अखेर न्याय: आरोपींना २२ जानेवारीला फासावर लटकवणार

गेल्या आठवड्य़ात अमेरिकेनं इराणचे कमांडर जनरल कासिंम सुलेमानी यांना बगदादमध्ये एका हवाई हल्ल्यात ठार केलं होतं. या हत्येचा बदला घेतल्याचं इराणने म्हटलंय. इराणने या लष्करी तळांवर १० क्षेपणास्त्र डागली आहेत. दरम्यान इराणमध्ये आज सकाळच्या सुमारास ४.७ रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. इराणच्य अणुऊर्जा केंद्राजवळ हा भूकंप झालाय. यात सध्या तरी अणुऊर्जा केंद्राला कोणताही धोका नसल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

Similar News