#IndependenceDay : शास्त्रज्ञांनी हिरवा झेंडा दाखवल्याशिवाय कोरोनावरील लस नाही : पंतप्रधान

Update: 2020-08-15 04:25 GMT

भारतात कोरोनावरील (corona) लसीला शास्त्रज्ञांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतरच ती वापरता येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी केली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात पंतप्रधानांनी कोरोनावरील लसीची सर्वजण वाट पाहत आहेत.

त्यावर देशातील शास्त्रज्ञ सातत्याने काम करत असून त्यांनी हिरवा कंदील दिल्याशिवाय ही लस वापरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. देशात सध्या तीन वेगवेगळ्या लसींवर काम सुरू आहे, अशी माहिती देखील नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. या लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांनी यांना हिरवा कंदील दिल्यानंतरच त्यांचा वापर करता येईल, पण लवकरच या लस तयार होतील असा दावादेखील त्यांनी केला आहे.

लस तयार व्हायला अजून वेळ लागणार असला तरी देशातील प्रत्येक नागरिकाला लस उपलब्ध करण्याबाबत सरकारने तयारी केलेली आहे. त्याबाबतचा आराखडा देखील तयार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. 15 ऑगस्ट पूर्वी भारतात कोरोनावरील लस येईल अशी चर्चा सुरू होती.

या लसीची निर्मिती करण्यात सहभागी असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना काही दिवसांपूर्वी ICMR ने एक पत्र पाठवून 15 ऑगस्ट पूर्वी आपण संशोधनाचे काम पूर्ण करावे अशा आशयाच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून या लसीबाबत घोषणा करतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण तूर्तास कोरोनावरील येणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

Similar News