चार दिवंगत केंद्रीय मंत्र्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार

Update: 2020-01-25 15:52 GMT

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये पद्मभूषण पुरस्काराने जॉर्ज फर्नांडीस यांच्यासह भाजपच्या दोन दिवंगत मंत्र्याना सन्मानित करण्यात आलं.

दिवंगत संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडींस, माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना पद्मभूषण पुरस्कार जाहिर झाला. तर गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालाय. पहिल्यांदाच पद्म पुरस्कारामध्ये चार दिवंगत केंद्रीय मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय.

महाराष्ट्रातल्या एकुण १३ जणांना पद्म पुरस्कार जाहिर झालेत. यामध्ये कला क्षेत्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार मिळालाय. केंद्र सरकारच्या ध्येय धोरणांचं समर्थन करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह आताच भारतीय नागरिकत्व मिळवलेल्या गायक अदनान सामी यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झालाय.

महाराष्ट्रातून यांना मिळाले पद्म पुरस्कार

पद्मभूषण

आनंद महिंद्रा- उद्योगपती

पद्मश्री

झहीर खान – क्रीडा

पोपट पवार- समाजसेवा

डॉ. रमन गंगाखेडकर- विज्ञान आणि अभियांत्रिकी

करण जोहर- कला

सरीता जोशी- कला

एकता कपूर- कला

राहीबाई पोपरे- कृषी

कंगना रानावत- कला

अदनान सामी- कला

सैयद्द मेहबूब शाह कादरी- समाजसेवा

सँन्ड्रा डिसूजा- औषधी

सुरेश वाडकर- कला

Similar News