कंटेनमेंट झोनमध्ये सण साजरे करण्यास मनाई

Update: 2020-07-16 01:30 GMT

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात सण उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

बकरी ईदसाठी सरकारचे नियम

कंटेंटमेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल. बकरे खरेदी-विक्रीसाठी सरकारच्यावतीने ऑनलाईन यंत्रणा तयार केली जाणार आहे. तसंच कुर्बानीसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. असेल. देवनार मंडीसारख्या मोठ्या मंडींना परवानगी देण्यात येणार नाही. मार्केट केवळ खुल्या मैदानातच लावले जाईल, असेही अस्लम शेख यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या ४ महिन्यांत सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे झाले. त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच केले आहे. सण उत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही, तसंच बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको, असंही आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलेल आहे.

Similar News