गोंदिया जिल्हा कोरोना मुक्तीकडे....

Update: 2020-06-20 15:02 GMT

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश येत आहे.आज सलग तिसऱ्या दिवशी नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून न आल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात 12 ते 17 जून दरम्यान 33 रुग्ण आढळून आले.त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते.मात्र आज सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्ण जिल्ह्यात आढळून आला नाही.जिल्ह्यात आतापर्यंत 102 कोरोना बाधित रुग्ण आढळले.69 रुग्ण उपचारातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 33 क्रियाशील रुग्ण आहेत.

जिल्ह्यात आढळलेले 102 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका - 31,सडक/अर्जुनी तालुका - 10, गोरेगाव तालुका - 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका - 2, गोंदिया तालुका - 22 आणि तिरोडा तालुक्यातील 32 रुग्ण आहे.

गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी 1738 घशातील स्त्राव नमुने पाठविण्यात आले.102 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.109 नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रलंबित आहे.69 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 909 आणि घरी 1949 असे एकूण 2858 व्यक्ती अलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Similar News