देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा ज्योतीष पाहावा : बाळासाहेब थोरात

Update: 2020-01-11 09:53 GMT

सहा महिन्यात सरकार पडणार असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दुसरा ज्योतीष पहाण्याचा सल्ला दिला आहे. ते आज अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणत होते की ‘महाविकास आघाडीचं सरकार सहा महिन्याच्यावर टिकणार नाही. भाजपच्या 220 जागा येणार, विरोधी पक्षाच्या विरोधी पक्ष नेता होईल इतक्या जागा येणार नाही. यातील त्याचं कोणतंच भविष्य खरं ठरलं नाही. त्यामुळं माझं असं मत आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी आता दुसरा ज्योतीष पहायला हवा आणि त्याच्याकडूनच भविष्य पाहायला हवं’.

फडणवीसांसमोर हे आव्हान...

भाजप मोठा पक्ष आहे. त्यांच्या अंतर्गत निवडणुकांवर मला काही बोलावसं वाटत नाही. परंतू त्यांनी भरपूर आवक (incoming) करून घेतलेली आहे. आणि आता त्यांना सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अंतर्गत निवडणूका आहेत. त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्र पाहत आहे की, भारतीय जनता पक्षाच्या अधोगतीला सुरुवात झाली आहे.

इनकमींग नाही...

त्यांनी जी आवक केली आहे. ती परतीच्या मार्गावर आहे. असा सवाल थोरात यांना केला असता, त्यांनी जी आवक केली आहे. त्यांनी काही दिवस तिथंच थांबायला हवं. या मताचा मी आहे. असं म्हणत इनकमींग करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जे परत येण्याच्या मार्गावर आहेत त्यांनी त्याच ठिकाणी काही दिवस रहावे भाजपची अधोगती सुरू झाली आहे.

भाजपच्या काळात फसवी कर्ज माफी...

भाजपच्या काळात फसवी कर्जमाफी झाली. त्यामुळे जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या. आम्ही जी कर्जमाफी केली आहे. त्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. दोन लाखाच्या वर कर्जमाफी असलेल्या शेतकऱ्यांना देखील लाभ मिळेल आणि जे शेतकरी नियमीत कर्ज भरत आहेत. त्यांच्यासाठी देखील सरकार लवकर निर्णय घेणार आहे.

JNU मध्ये जे घडलं विद्यार्थ्यांना गुंडाकडून मारहाण झाली. त्याचा निषेध संपुर्ण देशाने व नागरीकांनी केला पाहिजे. तो लोकशाहीवरील हल्ला होता असे मी मानतो. JNU च्या विद्यार्थ्याचे वैशिष्ट वेगळं आहे. त्यांना एक वैचारिक अशी पार्श्वभूमी आहे. ती त्या विद्यापीठाला कायम राहीली आहे. वैचारीक मंथन तिथे चालु आहे. तर विशेषतः पुरोगामी विचार मंथन तिथे सुरु असते.

कन्हैया कुमार सारख्या गरीब कुटुंबातील मुलगा JNU मधून पुढे आला. JNU मध्ये सुरु असलेलं मंथन थांबावं असं कुणी म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. पुरोगामी विचारच देशाला पुढे घेउन जाऊ शकतो. दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा निषेध मी करत आहे

Similar News