राज्याच्या शिक्षण धोरणासाठी नवीन थिंक टँक – शिक्षणमंत्री

Update: 2020-02-14 08:37 GMT

राज्याच्या शिक्षण विभागासाठी आणि शैक्षणिक धोरणात बदल करण्यासाठी थिंक टँक तयार करण्यात येत असून यामध्ये तज्ज्ञ मंडळींचा समावेस असेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीये. राज्यातल्या 725 शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लास रूम सुरु करण्यात येणार असून त्यातल्या 195 व्हर्च्युअल क्लास रूमचं उदघाटन आज पुण्यात वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

पुण्यातल्या ई बालभारती संस्थेत या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. शिक्षणक्षेत्रात दिल्ली तेलंगणा राजस्थान या राज्यात काही चांगले प्रयोग होत आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षण क्षेत्रात पुढे आहे. मात्र तरीही विविध राज्यातील शिक्षणातील प्रयोगांचा विचार करून त्यापुढे जाऊन महाराष्ट्रात शिक्षणाचा एक पॅटर्न तयार केला जाईल असे देखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिक्षणमंत्र्यांनी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचसोबत आठवी ते 10वीच्या अंध विद्यार्थ्यांसाठी बोलकी पुस्तके तयार करण्यात आली असून त्याचेही उदघाटन यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाकडून केल्या

Similar News