रेल्वे फुड स्टॉलवर खाताय... सावधान!

Update: 2019-12-21 16:07 GMT

मुंबईत दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. प्रवासादरम्यान आपण स्थानकांवरील स्टॉलवर वडापाव खाताना, थंड पेय पिताना दिसतात, काही जण अल्पोपहार घेत असतात. मात्र हे पदार्थ खात असताना आपण स्टॉलच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असतो. यामुळे दिवसेंदिवस ठेकेदार आणि आरोग्य अधिकारीही या गोष्टीकडे कानाडोळा करताना दिसत आहेत.

मुंबईतील रेल्वे स्थानकावरिल काही स्टॉल अस्वच्छ असण्याचं कारण म्हणजे रेल्वे स्थानकावरील हेल्थ इन्स्पेक्टर हे वेळेवर स्टॉलची पाहणी करत नाही. काही हेल्थ इन्स्पेक्टर हे फक्त महिन्यातून दोन वेळा स्टॉलची पाहणी करत असतात.

संपूर्ण मुंबईत रेल्वे स्थानकांवर 150 हून अधिक स्टॉल आहेत. परंतू काही स्थानकात स्टॉलची नियमीत स्वच्छता केली जाते.

रेल्वे स्थानकांवरील अस्वच्छ असणाऱ्या स्टॉल संदर्भात आम्ही रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांना विचारले असता, ‘आम्ही अस्वच्छ असणाऱ्या स्टॉलवर दंडात्मक कारवाई करु’ असं ‘मॅक्समहाराष्ट्र’शी बोलताना सांगितलं. येत्या काही दिवसात रेल्वे प्रशासन कशाप्रकारे अस्वच्छ स्टॉलवर कारवाई करणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Full View

Similar News