Covid19: शरद पवारांच्या कोव्हिड टेस्ट वर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया....

Update: 2020-08-17 06:37 GMT

शरद पवारांच्या (sharad pawar) 6 सुरक्षारक्षकांना कोरोनाची ( corona) लागण झाल्यानंतर त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली आहे. यावर राजेश टोपे (rajesh tope) यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली...

शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवरील (silver oak)6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृत्ती बाबत चर्चांना उधान आलं आहे. त्यानंतर शरद पवार यांची देखील कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती.

ही चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शरद पवार यांची मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

शरद पवार सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत. पवारांचा स्टाफ ज्या ठिकाणी राहतो, तिथेही चाचणी करत आहोत. त्यांची काळजी घेतली जात आहे.

काय म्हटलं टोपे यांनी

शरद पवार महाराष्ट्र आणि देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. काळजी घ्यावी असं आम्ही कायमच सांगत असतो. परंतु त्यांचा उत्साह, लोकांप्रति बांधिलकी किंवा दौऱ्यातून कदाचित संदेश द्यायचे असतात. ते स्वत:ही काळजी घेत आहेत, चिंता करण्याची काही गोष्ट नाही.

Similar News