कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचा पुढचा टप्पा सुरू

Update: 2020-08-11 09:31 GMT

कोरोनावरील भारतातील पहिली लस भारत बायोटेक आणि ICMR ने बनवली आहे. या लसीची मानवी चाचणी सध्या सुरू आहे. COVAXIN लसीची क्लिनिकल ट्रायल महाराष्ट्रात नागपूरच्या गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये सुरू असून आजपासून दुसऱ्या डोस देण्यास सुरुवात झाली आहे. २७ जुलैला पहिला डोस देण्यात आला होता.

त्याला 14 दिवस पूर्ण झाल्या नंतर आजपासून नागपूरसह संपूर्ण देशातील 12 सेंटर मध्ये दुसऱ्या डोस देण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरातील गिल्लूरकर हॉस्पिटलमध्ये ५५ स्वयंसेवकांना लसीचा दुसऱा डोस देण्यात आला. पहिला डोस घेतलेल्या सर्व 55 स्वयंसेवकांची प्रकृती व्यवस्थित असून आतापर्यंत कोणालाही लसीची रिअक्शन आलेली नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पहिल्या डोसचे परिणाम अतिशय चांगले असल्याचे गिल्लूरकर हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी सांगितले. दुसरा डोस दिल्यानंतर आता २८, ४२, १०४ आणि १९४ व्या दिवशी लस टोचली जाईल. सर्व टप्यातील डोसचे रिझल्ट चांगले राहिल्यास आपला देश लवकरच कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्माण करेल असा विश्वास डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी व्यक्त केला आहे.

Similar News